राजकारण

मोदींच्या एनडीएविरोधात विरोधकांकडून 'INDIA'ची घोषणा; काय आहे फुलफॉर्म?

भाजपविरोधात मंगळवारी बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीत 26 पक्षांनी मिळून INDIA या नावाने युती करण्याची घोषणा केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : भाजपविरोधात मंगळवारी बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीत 26 पक्षांनी मिळून इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (INDIA) या नावाने युती करण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आमची एकजूट पाहून पंतप्रधान मोदींनी 30 पक्षांची बैठक बोलावली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आमची एकजूट पाहून मोदीजींनी ३० पक्षांची बैठक बोलावली आहे. आधी ते त्यांच्या युतीबद्दल बोललेही नाहीत, त्यांच्याकडे एका पक्षाचे अनेक तुकडे झाले आहेत आणि आता मोदीजी ते तुकडे एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही पुन्हा महाराष्ट्रातील मुंबईत भेटणार आहोत. तेथे समन्वयकांच्या नावांवर चर्चा करून त्यांची नावे जाहीर करू. लवकरच मुंबई सभेची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारणात वेगवेगळ्या विचारधारा असतात, पण आपण देशासाठी एक आहोत. कुटुंबाला वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, देश हा आपला परिवार आहे आणि तो वाचवण्यासाठी आपण एकजूट झालो आहोत, असे लोकांना वाटते. या हुकूमशाही सरकारविरोधात आम्ही लढा देऊ.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, 26 पक्ष एकत्र आले आहेत, ही दुसरी बैठक होती आणि आघाडी वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. एकीकडे देशाला द्वेषापासून वाचवायचे आहे आणि दुसरीकडे नव्या भारताचे स्वप्न घेऊन आपण सगळे एकत्र आलो आहोत.

त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, ही लढत विरोधक आणि भाजपमधील नाही. हा लढा देशासाठी आहे. म्हणून इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया) हे नाव निवडण्यात आले. देशाचा आवाज चिरडला जात आहे, हा लढा देशासाठी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा