Rakesh Tikait Team Lokshahi
राजकारण

Rakesh Tikait यांच्या पत्रकार परिषदेत राडा; शाई फेकीनंतर जोरदार हाणामारी

पोलिसांनी शाई फेकणाऱ्यास घेतले ताब्यात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बंगळुरू : शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला असून एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली आहे. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून शाई फेकणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

स्थानिक माध्यमाने के चंद्रशेखर यांच्यावर स्टींग ऑपरेशन केले होते. यामध्ये चंद्रशेखरे यांनी बस स्ट्राईकच्या बदल्यात पैसे मागितले होते. या स्टींगमध्ये राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांचाही उल्लेख करण्यात आला होता.

याविषयी राकेश टिकैत यांना विचारले असता ते म्हणाले, माझे आणि चंद्रशेखर यांचे काहीही संबंध नाही. चंद्रशेखर फ्रॉड आहे, असे म्हणताच टिकैत यांच्यावर चंद्रशेखरच्या समर्थकांनी शाईफेक केली आहे. यानंतर टिकैत यांच्या समर्थकांनी शाईफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले. यावेळी टिकैत समर्थक आणि चंद्रशेखरच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रण मिळवले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना राकेश टिकैत म्हणाले, यामागे सरकारचा हात आहे. ही सर्व जबाबदारी पोलिसांची असून कर्नाटक सरकारची ही मिलीभगत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, यावर आता सरकार काय कारवाई करणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा