Uday Samant  Team Lokshahi
राजकारण

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; पहिल्याच बैठकीत एकनाथ शिंदे यांची मुख्यनेते पदी नियुक्ती

संघटनात्मक आपण कशापद्धतीने वाटचाल करायची यावर चर्चा झाली. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Published by : Sagar Pradhan

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर राजकीय चित्र एकदमच पलटून गेले. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मुंबईत पार पडली. या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत एकनाश शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेते पदी म्हणून निवड करण्यात आली आहे. सोबतच या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यासोबतच या कार्यकारिणीत पक्षाविरोधात कारवाई करणाऱ्यांसाठी एक तीन सदस्यांची समिती देखील तयार करण्यात आली आहे.

या कार्यकारणी बैठकीनंतर शिवसेना नेते उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बैठकीत झालेल्या सर्व निर्णयाबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, संघटनात्मक आपण कशापद्धतीने वाटचाल करायची यावर चर्चा झाली. याशिवाय सरकारने जे आठ महिन्यांत काम केले, त्या सर्व कामाची नोंद बैठकीत घेण्यात आली. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांवरुन त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. अशी माहिती त्यांनी दिली.

शिवसेना कार्यकारणीत हे झाले निर्णय?

- एकनाश शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेतेपदी म्हणून निवड करण्यात आली.

- शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील.

- शिवसेनेची आगामी संघटनात्मक वाटचाल करण्यासाठी शिस्तबद्ध समितीची स्थापन करण्यात आलीय.

- मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न.

- UPSC आणि MPSC च्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्णय.

- चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याचा निर्णय.

- राज्यातील भूमीपूत्रांना ८० टक्के नोकरी देणे.

- सर्व प्रकल्पात भूमीपूत्रांना ८० टक्के नोकरीमध्ये स्थान देण्याचा निर्णय.

- स्वातंत्र्यवीर सावकरकरांना 'भारतरत्न' देण्यासाठी प्रयत्न. खासदार राहुल शेवाळे यांनी सर्वात प्रथम लोकसभेत ही मागणी केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat Special Report : सामाजिक न्याय विभाग पुन्हा वादात, टेंडर प्रक्रियेत नियमांची पायमल्ली?

Latest Marathi News Update live : 'ज्यांना सगळं काही दिलं ते गद्दार झाले'; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Tesla's First Showroom In BKC : भारतात टेस्लाची एंट्री; मुंबईतील बीकेसी येथे सुरू होणार पहिलं शोरूम

Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की....