राजकारण

शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात; अजित पवार गटाच्या आरोपांना जयंत पाटलांचे जशात तसे उत्तर, म्हणाले...

अजित पवार गटाचे निवडणूक आयोगात शरद पवारांवर आरोप; जयंत पाटलांनी दिले प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. यादरम्यान अजित पवार गटाने शरद पवारांवर मोठे आरोप केले आहेत. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, अशी टीका अजित पवार गटाने निवडणूक आयोगात केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आपल्या पक्षातून जे गेले त्यांचा उल्लेख करायची गरज नाही. आपण आपली क्षमता वाढवली पाहिजे. सगळ्यांच्या मनात शंका आहेत कि हे सर्व जण आतून एकच आहेत. परंतु, असं काही नाही. शरद पवार निवडणूक आयोगात दिवसभर बसले होते यातच सगळं आलं. आता परतीचे दोर तुटले आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली की पवार साहेब हुकूमशाहा आहेत. उलट सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे म्हणजे पवार साहेब आहेत. मात्र, तुमच्या कार्यपद्धती वर बोललो तर अवघड होऊन जाईल, असा खोचक टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना लगावला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने शरद पवारांवर टीकास्त्र सोडले होते. पदाधिकाऱ्यांच्या फक्त नियुक्त्या व्हायच्या, निवडणूक व्हायच्या नाहीत. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले. ज्यांची निवड पवारांनी केली तेच पवारांची निवड कशी करू शकतात? जे स्वतः निवडून आले नाहीत ते इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात, असा थेट आक्षेप अजित पवार गटाने शरद पवारांवर घेतला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य