राजकारण

प्रदेशाध्यक्षपदाची नियुक्ती बेकायदेशीर; अजित पवार गटाच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, तर सर्व आमदार...

राष्ट्रवादी कोणाची यावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली आहे. यादरम्यान, अजित पवार गटाने आरोप करत जोरदार युक्तीवाद केला आहे. यावर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली आहे. यादरम्यान, अजित पवार गटाने आरोप करत जोरदार युक्तीवाद केला आहे. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा अजित पवार गटाने केली आहे. यावर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझी नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांना माझ्या सहीनेच एबी फॉर्म देण्यात आले. जर मी बेकायदेशीर असेल तर महाराष्ट्रातून सगळे निवडून आलेले आमदार देखील बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव दिसतो, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे. मी निवडणुकीने निवडून आलेलो आहे, मी निवडून आल्यानंतर प्रफुल पटेल यांनीच मला पत्र दिले, असाही पलटवार त्यांनी अजित पवार गटावर केली आहे.

संख्याबळाबाबत आमचे वकील युक्तिवाद करतील. कालच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली आहे. त्यामध्ये 24 राज्यांपेक्षा जास्त अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला. पहिल्यांदा ही जेव्हा घटना झाली तेव्हा या 24 लोकांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. पण, यानंतर अजित पवार गटाने जर कोणाला नियुक्ती दिली असेल आणि त्यांचे त्यांना समर्थन असेल, निवडणूक आयोगाने पूर्वी अध्यक्ष कोण होते हे विचारून घेऊन निर्णय द्यावा, असे जयंत पाटील म्हणाले आहे.

तर, चिन्ह गोठवण्याचा प्रश्न येत नाही. कारण पक्ष आणि चिन्ह शरद पवार साहेबांचा आहे. एखाद्याने उद्या भाजपच्या चिन्हाबद्दल प्रश्न उपस्थित केला तर ते तुम्ही गोठावणार का, असा खोचक सवालही जयंत पाटील यांनी केला आहे. शरद पवार संस्थापक आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली चालवलेल्या पक्षाला आतापर्यंत कोणीही चॅलेंज केलेले नाही. त्यांना सर्वांनी सर्वाधिकार दिलेले होते, हात उंचावून, त्याचे क्लिप सर्वांकडे आहेत. चिन्ह गोठवणे हे अन्यायकारक होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

पवार साहेबांच्या कार्यशैलीमधून हे लोक मोठी झाली आहे, तीच लोक आता त्यांना प्रश्न विचारत आहेत. पंचवीस वर्षे तुम्ही पवार साहेबांचे स्वतःमध्ये काम केलं, पंचवीस वर्षानंतर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली असेल तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे, इतक्या उशिरा का लक्षात आले? पक्षांतर्गत निवडणुका ज्यावेळी झाल्या त्यावेळेस असा प्रश्न कोणी विचारला नाही. घरातला लहान मुलगा जेव्हा मोठा होतो आणि त्याला स्वतंत्र व्हायचं असतं तेव्हा तो स्वतःच घर बांधतो, तो घरातून वडिलांना काढत नाही, यातच सगळं आलं, अशी टीका जयंत पाटलांनी अजित पवारांवर केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या