Jayant Patil | Devendra Fadnavis | Eknath Shinde Team Lokshahi
राजकारण

'मी पुन्हा येईल' फडणवीसांचा वक्तव्यावर जयंत पाटलांचा प्रतिक्रिया; म्हणाले, शिंदेंना भीती...

पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. कोल्हापूरमध्ये फडणवीसांचे विधान.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे काही राजकीय मंडळींकडून राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या सर्व घडामोडी दरम्यान मी पुन्हा येईन असा नारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत. याच विधानावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

'मी पुन्हा येईन' देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, त्यांच्या या वक्तव्याची आम्हाला भीती नाही. त्यांच्या त्या वक्तव्याची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असायला पाहिजे. पुन्हा येईन म्हणतायत आणि आलेलेच आहेत. फक्त दोन नंबरला बसलेले आहेत. त्यामुळे ते मी पुन्हा येईन म्हणत असतील आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला ढकलून स्वतः बसत असतील तर त्याची चिंता एकनाथ शिंदे यांनी केली पाहिजे. असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 'मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!