राजकारण

Jitendra Awhad : ठाणे महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंचा भगवा फडकवू

ठाणे महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंचा भगवा फडकवू

Published by : Siddhi Naringrekar

शुभम कोळी, ठाणे

आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणारे मात्र कितीही पाऊस पाडला तरी निष्ठाच जिंकणार असून पालिकेवर उद्धव ठाकरेंचा भगवा आम्ही फडकवणारच असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाडांनी केल्यामुळे ठाण्यात राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय.

आगामी काळातील ठाणे शहरातील मविआ ची वाटचाल कशा प्रकारे असेल हेच एकप्रकारे सूतोवाच त्यांनी केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये झालेल्या फाटाफुटीवर चांगलेच तोंडसुख घेतलं. ज्यावेळी उद्धव साहेब आजारी होते पूर्ण शरीर विकलांग झालं होतं ऑपरेशनला जात होते. त्यावेळी त्यांनी काही मोजक्याच जणांना फोन केले होते त्यातील मी एक होतो. मला म्हणाले प्रश्न मोठा आहे तुम्ही सर्व मिळून महाराष्ट्र ची काळजी घ्या. आणि नंतर आपल्याला माहितीच आहे काय झालं ते त्यामुळे या महाराष्ट्र मध्ये एक संताप आहे जनता विसरलेली नाही येणाऱ्या निवडणुकीत ठाण्यात उद्धव साहेबांचा भगवा आणि राज्यात मविआ सत्तेत येणारच असा विश्वास आव्हाडांनी व्यक्त केलाय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात