भूपेश बारंगे, वर्धा
शनिवारी सकाळी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ दौऱ्यावर येत आहे.त्या वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार आहे .त्यानंतर दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे.या पत्रकार परिषदेला वर्ध्यातील सर्व पत्रकारांनी बहिष्कार करण्याचे ठरवले असून श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे यांनी बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले.
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ या आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तेथे पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या यावेळी तेथील जेष्ठ पत्रकार यांनी काही प्रश्न उपस्थित केले असता त्यांनी तेथे पत्रकारांचा अपमान केला आहे. त्यांच्या या भूमिकेने भाजपच्या चित्रा वाघ अडचणीत येण्याची शक्यता आहे.त्यांचा आक्रमक भूमिका अडचणीत येणारी ठरल्याचे चिन्ह आहेत. यामुळे वर्ध्यात होणाऱ्या पत्रकार परिषदेत कोणीही जाऊ नये अशी विनंती श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे यांनी केले आहे. याच सह जिल्ह्यातील इतर पत्रकार संघटना या पवित्रा घेतला असून भाजप पदाधिकारी चक्रावले आहे. जिल्ह्यातील अनेक संघटनेने याला पाठिंबा दर्शविला आहे.