election 
राजकारण

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानास सुरुवात

महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठित बनलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठित बनलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुणेकर कोणाला कौल देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतर्फे कसब्याची जागा काँग्रेस लढत असून येथून रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राज्यातीलही राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांचे मोठे नेते पुणे आणि चिंचवडमध्ये तळ ठोकून बसले होते. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी पदयात्रा, रोड शोवर भर देत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. या पोटनिवडणुकीचा प्रचार भाजप आणि मविआच्या आरोप-प्रत्यारोपांनी तसेच, गौप्यस्फोटांनी गाजला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Lalbaugcha Raja 2025 : मुंबईत गणेशोत्सवासाठी लालबागच्या राजाभोवती आधुनिक सुरक्षा; एआय तंत्रज्ञानाचा वापर

Uddhav Thackeray : ठाकरे गटाला धक्का; माजी महापौर शिंदे गटात दाखल

Mira Road Accident : जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षीय बालकाचा मृत्यू

Maharashtra Weather Update: इशारा! पुढील काही दिवस 16 राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; महाराष्ट्रात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता