Arvind Kejriwal Team Lokshahi
राजकारण

दिल्ली महापालिकेवर दीड दशकानंतर आपचा झेंडा; केजरीवाल म्हणाले, मलाही पंतप्रधानांचे आशीर्वाद...

सकारात्मक राजकारण करा, नकारात्मक राजकारण करू नका, असा मोठा संदेश दिल्लीच्या जनतेने आज दिला आहे.

Published by : Sagar Pradhan

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने कमाल केली आहे. पंधरा वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर सत्ता असणाऱ्या भाजपला हरवून आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजपने कडवी लढत दिली आहे. तर काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यासाठी कष्ट करावे लागेल. मात्र, या विजयानंतर दिल्लीआप कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संबोधित केले.

काय म्हणाले विजयानंतर केजरीवाल?

सकारात्मक राजकारण करा, नकारात्मक राजकारण करू नका, असा मोठा संदेश दिल्लीच्या जनतेने आज दिला आहे. आम्ही शिवीगाळ करत नाही, आम्ही भांडत नाही.आज जनतेने भ्रष्टाचारमुक्तीची जबाबदारी दिली आहे, उद्याने स्वच्छ करण्याची जबाबदारी आहे. या विश्वासाचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. हे काम मी रात्रंदिवस पूर्ण करेन. हा आमचा प्रयत्न असेल. असे केजरीवाल यावेळी म्हणाले.

ज्यांनी मतदान केले नाही, त्यांची कामे मी आधी करून घेईन.

आजपर्यंत हे फक्त राजकारण होते, निवडणूक जिंकण्यासाठी जे करायचे होते ते आम्ही केले, आता आम्ही सर्व मिळून दिल्ली ठीक करू. मी भाजपचे सहकार्य घेणार असून काँग्रेसकडूनही सहकार्य घेणार आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्यांचे आभार, पण ज्यांनी मतदान केले नाही, त्यांची कामे आधी करून घेऊ, असे केजरीवाल म्हणाले.

मलाही पंतप्रधानांचे आशीर्वाद हवे आहेत

दिल्ली सुरळीत करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे केजरीवाल म्हणाले. विशेषत: केंद्राच्या सहकार्याची गरज आहे. केजरीवाल म्हणाले की, आज मला या व्यासपीठावरून दिल्ली सुरळीत करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद हवे आहेत. दिल्ली सुरळीत करण्यासाठी आम्हाला पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचा आशीर्वाद हवा आहे.

दिल्लीत आम्ही चौथी निवडणूक जिंकलो

अरविंद केजरीवाल म्हणाले की, माझ्याकडे अनेक लोक येतात. अनेक बडे नेते, जुने नेते म्हणतात मते मिळवण्यासाठी अपशब्द वापरावे लागतात. तुला मी-मी करावे लागेल. आम्ही शरीफांचा पक्ष आहोत. कोणी कितीही चिथावणी दिली तरी आम्हाला शिवीगाळ करायची नाही. शाळा, रुग्णालये बांधून मते मिळत नाहीत, असे लोक म्हणतात. वीज, पाणी, रस्ते निश्चित करून मते मिळवतात, असा संदेश दिल्लीच्या जनतेने दिला आहे. आज आपण दिल्लीत चौथी निवडणूक जिंकली आहे.

आम आदमी पक्षाला बहुमत

दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 233 जागांचे निकाल (दुपारी 2 वाजेपर्यंत) हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाला 126 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप 97 जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसने 7 जागांवर विजय संपादन केला आहे. तर 3 अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. अजूनही 17 जागांचे निकाल येणं बाकी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश

AsiaCup 2025 : BCCI च्या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ,शुभमन गिल उपकर्णधार

Sanjay Raut PC : 'बहुमत असूनही NDA कडून आमच्या मित्रपक्षाला फोन का केला जातो?' संजय राऊत यांचा सवाल

Mumbai BEST Election Result : शशांक राव यांचा पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना मोठा धक्का; फडणवीसांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त, म्हणाले...