राजकारण

Madhya Pradesh Election Results : काँग्रेसचा हात की, भाजपचं कमळ फुलणार

मध्य प्रदेशमध्ये निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 2018 मध्ये मतदारांनी कॉंग्रेसला 114 जागांचा कौल दिला होता. तरीही भाजपनं मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन कमळ राबवून कमलनाथांचं सरकार पाडलं होतं.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Madhya Pradesh Election Results : मध्य प्रदेशमध्ये निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 2018 मध्ये मतदारांनी कॉंग्रेसला 114 जागांचा कौल दिला होता. तरीही भाजपनं मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन कमळ राबवून कमलनाथांचं सरकार पाडलं होतं. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनीही भाजपची वाट धरल्यानं भाजपची ताकद मध्यप्रदेशमध्ये वाढली आहे.

चार राज्यांचा निकाल आज जाहीर होतो. मात्र, सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मध्य प्रदेशमध्ये काय होणार याकडे लागले आहे. 2018 मध्ये मतदारांनी कॉंग्रेसला 114 जागांचा कौल दिला होता. तरीही भाजपनं मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन कमळ राबवून कमलनाथांचं सरकार पाडलं होतं. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. ज्योतिरादित्य शिंदे यांनीही भाजपची वाट धरल्यानं भाजपची ताकद मध्य प्रदेशमध्ये वाढलीये. सध्या विधानसभेत भाजपाकडे १२८ तर काँग्रेसकडे ९८ आमदारांची ताकद होती.

मध्य प्रदेशमध्ये भाजपनं सर्वच राजकीय गणितं मांडली असली आणि ताकद लावली असली तरी अनेक पोल पंडितांनी मात्र कॉंग्रेस आघाडीवर राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी कमलनाथ यांचाच चेहरा पुढे केला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेला धोका आणि जनतेने काँग्रेसला दिलेली सत्ता, भाजपने चोरली ही भूमिका कॉंग्रसने प्रचारात आक्रमकपणे मांडली आहे.

तर दुसरीकडे भाजपच्या प्रचाराची कमान केंद्रीय नेत्यांच्या हाती होती. भूपेंद्र यादव, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गृहमंत्री अमित शहासुद्धा सक्रिय होते. शिवराज यांनी सुरू केलेली ‘लाडली बहना’ ही योजना, अयोध्येत होणारे राम मंदिर, ओबीसी आणि आदिवासी केंद्रीत प्रचार यावर भाजपनं जोर दिला होता.

पोल पंडितांनी वर्तवलेल्या अंदाजामध्ये काँग्रेस आणि भाजपाच्या जागांमध्ये फारसा फरक नाही आहे. दोन्ही पक्ष बहुमताच्या अगदी जवळ पोहोचत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात अगदी थोड्या फरकाने भाजप किंवा कॉंग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता आहे. आत्ता मध्य प्रदेशमध्ये कुणाची सत्ता येते, याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार