राजकारण

Uddhav Thackeray - Eknath Shinde : उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदेंमध्ये 'का रे दुरावा' ; एकत्रित बसणं टाळलं, शिंदेच्याही 'त्या' कृतीने वेधलं लक्ष

उद्धव ठाकरे यांच्या सूचक वागणुकीने राजकीय चर्चेला उधाण

Published by : Shamal Sawant

विधिमंडळाच्या परिसरात अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या फोटोसेशनमध्ये एक वेगळीच राजकीय झलक पाहायला मिळाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व पक्षांचे नेते आणि आमदार एका मंचावर बसून एकत्र फोटोसेशन करत असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वागणे उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरले.

फोटोसेशन सुरू असताना उद्धव ठाकरे मागून पोहोचले. त्यांना पाहताच भाजप नेते चंद्रकांत पाटील तातडीने उठले आणि त्यांना आपली जागा देण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरे पुढे चालत गेले. त्यानंतर त्यांनी थेट एकनाथ शिंदे आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांच्या जवळ पोहोचत नीलम गोरे यांना शिंदेंच्या बाजूला बसण्यास सांगितले आणि स्वतः त्या बाजूला असलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले.

यानंतर काही वेळ दोघांमध्ये गप्पा रंगल्या, तर फोटोसेशनचे क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त होत राहिले. या फोटोसेशनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते आणि आमदार सहभागी झाले होते.

उद्धव ठाकरे यांचे हे सायलेंट राजकारण आणि सूचक बसण्याची शैली अनेक राजकीय अर्थांनी भरलेली असून, आगामी राजकीय घडामोडींना दिशा देणारी ठरू शकते, असा राजकीय वर्तुळात कयास व्यक्त केला जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मिरा रोडच्या दौऱ्यावर

Pune Airport : पुणे विमानतळावरून लवकरच 15 मार्गांवर विमानसेवा; मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागातील पाणीपुरवठा आज राहणार बंद

Earthquake in Alaska : अमेरिकेत भूकंपाचे तीव्र धक्के; आता त्सुनामीचाही दिला इशारा