Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची तोफ आज खेडमध्ये धडाडणार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यात सभा होणार आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

रत्नागिरी :  शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज रत्नागिरीत (Ratnagiri) सभा होणार आहे. ही सभा रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये (Khed) होणार आहे. सायंकाळी पाच वाजता ही जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

खेडमध्ये सेनेची ताकद जास्त : खेडमध्ये सेनेचे प्राबल्य आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम शिंदे गटात गेल्यानंतर ही येथील शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. मात्र, आगामी निवडणुकीच्या तोंडावर आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक जण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. पदाधिकारी आणि मतदारांमधील संभ्रम दूर करण्यासाठी आणि त्यांचे मनोबळ वाढण्यासाठी उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, रामदास कदम यांच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडलेले माजी आमदार संजय कदम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा घरवापसी करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या या सभेकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सभेसाठी सूचना जारी : खेड हा आपला मतदारसंघ आहे. तो आपलाच राहिला पाहिजे. या मतदारसंघात होणाऱ्या सभेला मैदान अपुरे पडेल, एवढी गर्दी होईल,असे नियोजन करा, अशा सूचना करण्यात आल्या हेत. त्यानुसार येथील सभेची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी या सभेच्या मैदानाची नुकतीच पाहणी केली. तिथल्या एकूण परिस्थीतीचा आढावा घेतला. येथील सभेची जवळपास तयारी पूर्ण झाली आहे.

असा असेल दौरा : सकाळी दहा वाजता पवनहंस येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी खेड येथे ते जातील. अकरा वाजता भरणे नाका येथे पोहोचतील. तेथून माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ते रवाना होतील. सायंकाळी 5 वाजता खेडमधील गोळीबार मैदानावर सभेला संबोधित करतील. सभा संपल्यानंतर पुन्हा ते आमदार वाईकर यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. शिवसैनिकांची गाठभेट आणि बैठक यावेळी होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता खेडवरून मुंबईकडे येण्यास निघतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...