राजकारण

Vishwajeet Kadam : संजय राऊतांच्या अंगात आलं अन्...

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उलघडले गुपित

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सांगली : शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) कलह, पहाटेचा शपथविधी आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिवसेना या तीन पक्षांचे एकत्र सरकारचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात करण्यात आला. समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी सरकारला आज अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार सत्तेत कसे आले, असा प्रश्न अनेकांच्या मनात आजही अनुत्तरीतच आहे. याचे उत्तर आता राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी दिले आहे.

महाविकास आघाडी कशी सत्तेवर आली हे सांगताना, निवडून आलो तरी विरोधी बाकावर बसावं लागणार होतं. पण, शिवसेना खा.संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. आणि उपस्थितितांच्या चेहऱ्यावर हास्यलकिरी उमटल्या. राज्यमंत्र्यांच्या या मिश्किल बोललण्याने आमणापूर ग्रामस्थांना पुन्हा स्व.डॉ. पतंगराव कदम यांची आठवण आली.

विश्वजीत कदम यांनी आमणापूर गावातील विविध विकासकामांसाठी उपस्थित होते. यावेळी आमणापूर ग्रामस्थांना संबोधित करताना राज्यमंत्री चांगलेच मुडमध्ये बॅटींग करताना पाहायला मिळाले. कार्यक्रमाला उशिर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच अजून पोळ्या खायच्या राहिल्याचे सांगितले. एवढा उशीर होईल माहिती असते तर दिवस ही वेगळा निवडला असता आणि दहा बारा बोकड, असे विश्वजीत कदम यांनी म्हणताच उपस्थितांनी मनापासून हसून दाद दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा