Mamata Banerjee Team Lokshahi
राजकारण

ममताच्या तोंडून RSS बद्दल कौतुकास्पद वक्तव्य अन्...

ममता बॅनर्जींच्या तोंडून आरएसएसची स्तुती राजकीय वर्तुळात बनला चर्चेचा विषय

Published by : prashantpawar1

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) अनेकदा चर्चेत असतात. आता ममता आरएसएसवर केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये त्या आरएसएस इतकी वाईट नाही असं म्हणताना दिसत आहे. आता ममता बॅनर्जींच्या तोंडून आरएसएसची स्तुती हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. विरोधी पक्षाचे नेतेही त्यांचा हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

वास्तविक या व्हायरल व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी बसलेल्या दिसत आहेत. व त्या आरएसएसचा उल्लेख करतात. आरएसएस एवढेही वाईट नाही, असं त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं आणि लगेच सोशल मीडियावर चर्चेचं वादळ आले आहे. संघात अजूनही काही लोक आहेत जे भाजपसारखे विचार करत नाहीत. यावेळी ममता यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, टीएमसीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, असे करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. ममताचा हा व्हिडिओ काँग्रेस नेते नेपाल महतो यांनीही शेअर केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा