मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले आहेत. या सगळ्या प्रकारानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. अशातच आता धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. धनंजय मुंडे यांनी फरार आरोपी कृष्णा आंधळेला पळून जायला मदत केल्याचा आरोप केला जरांगे यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप दाखल करावे अशी मागणी केली आहे. मुंडे यांच्यावर 302 कलम लावावे. तसेच त्यांना 100% आरोपी करणे गरजेचे असल्याची मागणी जरांगेंनी केली आहे. यामध्ये वाल्मिक कराडला पुढे केले. वाल्मीक कराडने धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन सगळं जाहीर करावे असे वक्तव्य जरांगे यांनी केले आहे.
फरार आरोपी कृष्णा आंधळेला पळून जाण्यासाठी मुंडे यांनी मदत केली. त्याचा मोबाईल देखील फेकून दिला. त्यामुळे देशमुख यांचा खून झाल्यापासून राजीनामा होईपर्यंत, त्यांचे कॉल डिटेल्स तपासले पाहिजेत. धनंजय मुंडे यांना पुरवणी जबाबात घेणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी मंत्रिपद आणि आमदार पदापासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे. ३०२ मध्ये त्यांना अटक केली पाहिजे, असंही जरांगे म्हणाले.