राजकारण

Manoj Jarange Patil Hospitalized: मनोज जरांगे पाटील 'या' कारणामुळे दुपारी रुग्णालयात दाखल...

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज 24 डिसेंबर, दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील `गॅलेक्सी` या खासगी रुग्णालयात दाखल झाले.

Published by : Team Lokshahi

Jarange Patil Hospitalized: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज 24 डिसेंबर, दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील `गॅलेक्सी` या खासगी रुग्णालयात दाखल झाले. सातत्याने सभा आणि त्यातील भाषणांमुळे जरांगे पाटील यांना खोकल्याचा त्रास जाणवत आहे. शिवाय थंडी वाढल्यामुळे ताप आणि सर्दीचाही त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने जरांगे पाटील आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

बीड येथील सभा झाल्यानंतर आता मनोज जरांगे आज छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. अंगदुखी आणि खोकल्यामुळे छातीत त्रास होत असल्याने उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. तसेच, त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान, जरांगे छत्रपती संभाजीनगरला पोहचताच त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्याचे मैदान गाजवणारे मनोज जरांगे पाटील मैदानावर फटकेबाजी करताना दिसले. त्यांच्या या फटकेबाजीची चर्चा राज्यभरात होत असतांना दुपारी मात्र `व्हायरल`च्या त्रासामुळे त्यांना रुग्णालय गाठावे लागले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर