मनोज जरांगे पाटील यांचं नवव्या दिवशी उपोषण स्थगित. मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार. गेल्या नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी आता उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आचासंहिता लागेपर्यंत आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मराठ्यांनी खचून जाऊ नये, सरकारने आपल्याशी धोका केला तर तुम्ही आपल्या लेकरांना धोका देऊ नका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.