राजकारण

छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेलं वक्तव्य भोवलं, राहुल सोलापूरकर यांचा भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा

छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य केल्यामुळे राहुल सोलापूरकर अडचणीत

Published by : Team Lokshahi

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते राहुल सोलापुरकर सध्या खुप चर्चेत आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ते अडचणीत आले होते. त्यांनी या वक्तव्यामुळे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमकतेची भूमिका साकारत राहुल सोलापूरकर यांच्यावर राग व्यक्त केला होता. उदयन यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले होते की, "सोलापुरकरसारख्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. जिथे दिसतील तिथे त्यांना ठेचून काढले पाहिजे". दरम्यान आता राहुल सोलापूरकर यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तव्याप्रकरणी सर्व स्तरातून राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली जात आहे यामुळे राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये बैठक झाली. सुमारे तासभर ही बैठक चालली. संस्थेच्या नियमक मंडळाचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर देखील बैठकीत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे राहुल सोलापूरकर केलेलं वक्तव्य तसेच भूमिकेशी भांडारकर संस्थेचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं.

राहुल सोलापुरकर नक्की काय म्हणाले होते?

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं सत्य नाकारलं. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रामधून बाहेर पडण्यासाठी पेटारे वगैरे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन ते महाराष्ट्रात परतले". या व्यक्तव्याचा उदयनराजे भोसले तसेच शिवप्रेमींनी निषेध केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा