Eknath Shinde and Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

शिवसेनेला धक्के पे धक्के : मुंबईतील दोन आमदार गुवाहटीत

मुंबईतील कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर हेदेखील नॉट रिचेबल झाल्याचं समोर आले आहे.

Published by : Team Lokshahi

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वर्षा सोडून मातोश्रीकडे जात असतांना आणखी धक्के शिवसेनेला बसत आहे. आणखी एक मंत्री आणि दोन आमदार गुवाहटीकडे रवाना झाले असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यांसाठी सुरतला खाजगी जेट विमानाची सोय करण्यात आली आहे.

शिवसेनेची मुलूख मैदान तोफ म्हणून ओळख असणारे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यांसह 4 आमदार शिंदे गटात बुधवारी पोहोचले आहे. त्यांच्यासोबत मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित यांचा समावेश आहे.

मुंबईतील कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर हेदेखील नॉट रिचेबल झाल्याचं समोर आले आहे.

दरम्यान उदय सामंत यांनी खुलाशा केला आहे की, बंडखोरांच्या गटात आपण नाही. यासंदर्भात आलेल्या बातम्या निराधार आहे.

एकनाथ शिंदे यांचे टि्वट

या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे असं म्हटले आहे. तसेच गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि यामध्ये शिवसैनिक भरडला गेला आहे. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. म्हणून आता महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. या टि्वटनंतर चार आमदार दाखल झाले असून तीन आमदार दाखल होण्याचा मार्गावर आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा