राजकारण

आमदार किशोर जोरगेवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपमध्ये प्रेवश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

अनिल ठाकूर, चंद्रपूर

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात कार्यकर्ता संवाद बैठकीच्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमचं किशोर जोरगेवार यांच्याशी बोलणं सुरु आहे. मला अपेक्षा आहे. किशोर जोरगेवार भारतीय जनता पक्षामध्ये जी काय आमची चर्चा झाली आहे. त्याप्रमाणे ते येतील. आता त्यांचा निर्णय त्यांनी करायचा आहे.

आमच्याकडून त्याठिकाणी काही लपून छपून नाही आहे. ते आलेत तर आम्ही विचार करु, नाही आले तर आमचा जो काही कार्यकर्ता असेल तो लढू पण कमळ लढणार. सुधीरभाऊ बसतील, मी बसेन, देवेंद्रजी बसतील राजकीय निर्णय आहे.

राजकीय निर्णय सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, चंद्रपूरच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. त्याठिकाणी राजकीय प्रश्न सोडवून आम्ही करु असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन