Amit Thackeray  Team Lokshahi
राजकारण

मी राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो - अमित ठाकरे

अमित ठाकरे यांचा बाळासाहेबांसोबत प्रसंग आठवून कंठ दाटून आला. मला बाळासाहेबांचा फारसा सहवास लाभला नाही. पण, मी लहानपणी जेव्हा त्यांना भेटायचो, तेव्हा ते मला ब्रुस ली म्हणायचे

Published by : Sagar Pradhan

मनसेचे युवा नेता अमित ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते औरंगाबाद येथे असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चालू राजकीय परिस्थीवर भाष्य करत खळबळजनक विधान केले आहे. मी जर राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो असे वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केले.

काय म्हणाले अमित ठाकरे?

महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहून मी राजकारणात आलो नसतो. अमित ठाकरे हे सध्याच्या राजकारणाला कंटाळले आहे का ? मनसेला संघर्ष करूनही यश मिळत नाही म्हणून कंटाळले आहे का ? अशा विविध चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी देखील सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त करत राजकारणाचा दर्जा घसरत चाललाय अशी खंत व्यक्त केली होती. मी राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बाळासाहेब मला ब्रुस ली म्हणायचे

मला बाळासाहेबांचा फारसा सहवास लाभला नाही. पण, मी लहानपणी जेव्हा त्यांना भेटायचो, तेव्हा ते मला ब्रुस ली म्हणायचे, एवढंच आठवतं. असा हळवा कोपरा उलगडताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांचा कंठ दाटून आला होता.

कशाला हवेत सगळे ठाकरे एकत्र

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला त्यावर उत्तर देतांना अमित ठाकरे म्हणाले की, "सगळ्या ठाकरेंनी एकत्र यावे, असे मला वाटत नाही, प्रत्येकाचे विचार, पक्ष वेगळे आहेत. तसा प्रयत्नही ठाकरे परिवारांमध्ये होत नाही. आणि कशाला हवेत सगळे ठाकरे एकत्र? असा प्रतिप्रश्‍न करत याविषयी अधिक बोलण्यास रस दाखवला नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा