राजकारण

एक सुशीताई आहेत, ज्यांच्या वरच्या मजल्यावर घनदाट 'अंधार' आहे : मनसे

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावरुन अंधारे यांनी मनसे आमदारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

डोंबिवली : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. एक माणसाचा उठ दुपारी अन् घे सुपारी असा कार्यक्रम असतो, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. यामुळे सुषमा अंधारे यांच्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी नाव घेता टीका केली आहे. मनसे आमदार यांनी ट्विट आणि फेसबुक पोस्ट करत टीका केली आहे.

मनसे आमदार याचं ट्विट....

'वरचा मजला रिकामा' असा मराठीत वाक्प्रचार आहे,परंतु आमच्याकडे एक सुशी ताई आहेत ज्यांच्या 'वरच्या मजल्यावर' घनदाट 'अंधार' आहे. आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकुल आठवत नाही आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात, असे निशाणा राजू पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर साधला आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे. सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेची सभा मुलुंडमध्ये झाली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका करताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, "आमच्याकडे एक असा माणूस आहे पठ्ठ्या.. उठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो. याला थोडं बोलेन, त्याला थोडं बोलेन, काही वेळासाठी विचारवंत होईल, मध्येच मिमिक्री कलाकार होईल असा त्यांचा कार्यक्रम असतो, अशी टीका निशाणा राज ठाकरेंवर केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा