राजकारण

धमक नाही तर...; मनसे नेत्याने आदित्य ठाकरेंना सुनावलं

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत टोलनाक्यांवर भाष्य केलं.

Published by : Siddhi Naringrekar

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत टोलनाक्यांवर भाष्य केलं. त्यांनी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्गावरील टोलनाके बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच ते म्हणाले की, आता सर्व रस्त्यांची डागडुजी हे मनपाकडून होत आहे. मग, माझा प्रश्न असा आहे की टोल नाका आणि इतर जाहिरातींच्या होर्डिंगचे पैसेही मनपाला का दिले जात नाही? हे सगळे पैसे एमएसआरडीसीकडे जात आहे. सर्वात जास्त कर मुंबईकर देत असतात. एमएसआरडीसीचे मुंबईच्या रस्त्यांवर काही काडीमात्र काम नाही. मग, होर्डिंगचे पैसे आणि टोलचे पैसे हे महानगर पालिकाला यावे. हे सर्व पैसे राज्य सरकार आणि एमएसआरडीसीला जात आहे. पण, जर मनपा सगळ करत आहे तर टोल नाका रद्द व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आमचं सरकार आलं की टोल बंद होणार असे आदित्य ठाकरे म्हणाले.

यावर मनसेचे अमेय खोपकर म्हणाले की, राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर ६५ टोलनाके बंद झाले. आम्ही बोलत नाही करुन दाखवतो. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचं का नाही सुचलं? धमक नाही तर फुकाची आश्वासनं द्यायची कशाला? असल्या टोलवाटोलवीला लोकं कंटाळली आता, तेव्हा नुसतं बोलू नका, आमच्यासारखी करुन दाखवायची हिंमत ठेवा #penguinsena असे म्हणत आदित्य ठाकरेंना सुनावलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा