राजकारण

Raj Thackeray : भाजपासोबतच्या युतीबाबत राज ठाकरेंनी सरळ सांगून टाकले...

मनसे-भाजप युतीची चर्चा सुरू आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मनसे-भाजप युतीची चर्चा सुरू आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना याबाबत सरळ सांगितले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, कोणी कोणाला भेटला की युती होत नसतात. भाजपा सोबत जाणार नाही. मागे एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. तेव्हा शरद पवार आले होते. त्यामुळे लगेच युती झाली का? असे राज ठाकरे म्हणाले.

तसेच सरकारवरसुद्धा त्यांनी टीका केली आहे. समृद्धी महामार्ग फेन्सिंग न लावता मोकळा केला. त्यावर कुत्रे, गायी, हरणं येत आहेत. ज्या स्पीडला लोकं जाणार गाड्या घेऊन, ट्रक घेऊन, तर अपघातात मरणार. ही सरकारची जबाबदारी नाही का?  टोलमुक्त महाराष्ट्र करू हे भाजपने निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं त्याचं काय झालं ते भाजपने सांगावं ना. प्रत्येक वेळेला म्हैस्कर नावाच्या माणसाला टोलची कंत्राटं मिळतात तो कुणाचा लाडका आहे?

 मुंबई-पुणे महामार्गावर दोन्ही बाजूला फेन्सिंग टाकलं गेलं. तसं समृद्धी महामार्गावर टाकलं नाही. त्यामुळे आतापर्यंत अपघातात 400 लोकं मृत्यूमुखी पडले. त्याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा