admin
राजकारण

Raj Thackeray यांच्या सभेपुर्वी औरंगाबादमध्ये पोस्टर वॉर

Published by : Team Lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) शनिवारी पुण्यावरुन औरंगाबादला शनिवारी पोहचले आहे. आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची तोफ औरंगाबादेत गरजणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi)ते घेरणार आहेत. दुसरीकडे त्यांच्या सभेपुर्वी मनसे व शिवसेनेत पोस्टर वॉर रंगले आहे.

औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा राज ठाकरे (raj thackeray)यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं. या सभेपुर्वीवर औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यात पोस्टर वॉर रंगलेलं आहे. मनसेने राज यांच्या नियोजित सभेपुर्वी शहरातील चौकाचौकात पोस्टर्स लावले आहेत. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेनं जिथं पोस्टर लावलेत, अगदी त्याच्या समोरच शिवसेनेकडूनही पोस्टर लावले आहेत. मनसेने लावलेल्या बॅनर्समध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख 'हिंदूजननायक' करण्यात आला आहे. तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सम दुसरा होणे नाही' असे लिहिले आहे.

मुंबईत रंगले होते पोस्टर वॉर

मुंबईत शिवसेना (Shivsena) आणि मनसेमध्ये (Mns) पोस्टर वॉर झालं होते. मनसेने शिवसेना भवनासमोर मुख्यमंत्र्यांच्या बदलत्या भूमिकेबाबत पोस्टर लावले होते. दादर येथील सेना भवनासमोर मनसेकडून ठाकरे बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे चालवत आहेत असं बॅनर लावण्यात आलं होतं. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना समज द्यावी असा देखील बॅनरमध्ये आशय होता. या बॅनरमध्ये एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधी भेट घेतली असल्याचा फोटो आहे. तसेच बॅनरमध्ये काल,आज आणि उद्या असा आशय लिहिला आहे. त्यानंतर शिवसेनेने राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेतबाबत पोस्टर लावलं होतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा