कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गातील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मनसेने आमरण उपोषण पुकारले आहे. जवळपास १० हून आधिक मुद्द्यावर हे उपोषण करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रशासनास लेखी पत्रव्यवहार करुन देखील काही उत्तर न मिळाल्याचा आरोप यावेळी प्रशासनावर करण्यात आला.
कराड पाठण चिपळूण या रस्त्याच सहा पद्रीच काम एलएनटी कंपनीला दिल होत. आणि या कामाची मुदत २०१९ मध्ये संपली. परंतु या रस्त्याच काम अर्धवट ठेवलं आणि अजून ते काम पूर्ण झालेलं नाही. दरम्यान या रस्त्यासाठी सर्व नागरिकांकडून पैसे घेतले पण काम काही केलं नाही. जर लवकर या कामाची चौकशी करुन कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल करुन, झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करण्याची मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.