राजकारण

महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या...; मनसेकडून राज ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ ट्विट

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःवर गोळी झाडून घेतल्या.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनसेकडून राज ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीमधील एका भागाचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या... असे लिहिण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rahul Gandhi PC : मतांची फसवणूक नेमकी कशी झाली? राहुल गांधींनी थेट पुरावे सादर; नाव एका व्यक्तीचं, मत दुसऱ्याचं आणि...

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Laxman Hake on Manoj Jarange : "चौथी नापास दिल्लीत काय करेल?" जरांगेंच्या दिल्ली मेळाव्यावर हाकेंची चिडचिड?

Ram Kadam on Sanjay Raut : बाळासाहेबांना मानणारे कार्यकर्ते हळूहळू भाजपमध्ये..." राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर राम कदमांची प्रतिक्रिया