MNS Party office, Ghatkopar Team Lokshahi
राजकारण

घाटकोपरमध्ये मनसैनिकांकडून राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन; थेट कार्यालयावरच लावले भोंगे

Published by : Vikrant Shinde

काल झालेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) ह्यांनी महाविकास आघाडीवर (MVA Goverment) विशेषत: राष्ट्रवादी व शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला. दरम्यान, बोलताना त्यांनी मुस्लिम सामाजातील काही बाबींवरही टीका केली.

काय म्हणाले होते राज ठाकरे?
'मशिदीवर असलेले भोंगे हे सरकारला उतरवावेच लागतील. आणि जर, असं नाही केलं तर, त्या मशिदींच्या बाहेर दुप्पट लाऊड स्पीकर्स (Loud Speakers) लावा व त्यावर हनुमान चालिसा लावा. माझा कोणत्याही धर्माला विरोध नाही पण प्रत्याकाने आपली भक्ती आपल्या गरापुरती मर्यादित ठेवावी.'

घाटकोपरमध्ये राज यांच्या आदेशाचं पालन:
घाटकोपरमधील श्री हिमालयश्वर मंदिरच्या बाजुला, हिमालय सोसायटी, होमगार्ड येथे पुर्ण दिवस श्री.हनुमान चालीसा व श्री.गणेश आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच, घाटकोपर परिसरात मनसैनिकांनी ढोल तश्याचंही आयोजन केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा