राजकारण

'सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी'

मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंवर ट्विटरवरुन निशाणा साधला असून राखी सावंत हिच्याशी तुलना केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट धमकीवजा इशारा दिला होता. याला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीवर या, असे थेट आव्हानच बावनकुळेंना दिले होते. याचा भाजप नेते मोहित कंबोज यांनी खरपूस समाचार घेतला आहे. कंबोज यांनी थेट सुषमा अंधारेंची राखी सावंतशी तुलना केली आहे.

मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंवर ट्विटरवरुन निशाणा साधला असून राखी सावंत हिच्याशी तुलना केली आहे. सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी. एक महाराष्ट्राच्या राजकारणात, तर दुसरी महाराष्ट्राच्या सिनेमात. या दोघीच एकमेकींच्या स्पर्धक आहेत. दोघींपैकी कोण जास्त सनसनाटी करणार यातच दोघींची स्पर्धा, असा टोला मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंना लगावला आहे.

दरम्यान, रोशनी शिंदे प्रकरणाविरोधात महाविकास आघाडीने ठाण्यात महामोर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये सुषमा अंधारेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले होते. काल फडतूस शब्द वापरला तेव्हा काही भक्तगण चवथाळले. मग लोढा, चंद्रकांत पाटील यांनी महाराजांचा अपमान केला. तेव्हा भक्तांना राग आला नाही का? भक्तांचा चॉईस किती फडतूस आहे, अशी टीका त्यांनी केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?