थोडक्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत
काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढणार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची घोषणा
(Vijay Wadettiwar) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसने मुंबईत 'एकला चलो'चा नारा देण्यात आला आहे. "आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आतातरी कुठला प्रस्ताव नाही. हे स्पष्ट आहे". असे विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.