Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

मविआने मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेटच संजय पांडेंना दिलेलं; फडणवीसांचा गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात महाविकास आघाडीवर खळबळजनक आरोप केला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात महाविकास आघाडीवर खळबळजनक आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप त्यांनी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो. परंतु, मला मातोश्रीचे दरवाजे बंद होते. एवढेच नाहीतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर केसेस टाकून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे व काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं. मी काहीही केलं नव्हतं त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

तसेच, माझ्याकडून त्यांच्याप्रती कुठलीही कटुता नाही. एका कार्यक्रमात मला रश्मीवहिनी भेटल्या असता उद्धवजींना माझा नमस्कार सांगा, असे मी सांगितले. कारण महाराष्ट्राची संस्कृती वैर जपणारी नाही, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा