राजकारण

मोदी सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयकही निवडणूक ‘जुमला’च : नाना पटोले

मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयकाआता लोकसभेत मांडले आहे. यारुन नाना पटोलेंनी टीकास्त्र सोडले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिला विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून हे विधेयक आता लोकसभेत मांडण्यात आले आहे. परंतु, भाजपाची आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहता हे महिला विधेयक हे आणखी एक निवडणूक जुमलाच ठरेल, असे दिसत आहे. विधेयकातील तरतुदी पाहता महिला आरक्षण विधेयक इव्हेंट मॅनेजमेंटशिवाय दुसरे काहीही नाही. महिला आरक्षण कायदा झाला तरी त्याची अंमलबजावणी २०२४ च्या निवडणुकीसाठी होणार नसून देशातील कोट्यवधी महिलांचा मोदी सरकारने भ्रमनिरास केला आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर झाले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता दिसत नाही. लोकसभा व विधानसभेतील ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याआधी जनगणना होणे गरजेचे आहे, २०२१ साली होणारी जनगणना मोदी सरकारने अद्याप केलेली नाही, तसेच मतदारसंघ पूनर्रचना केल्यानंतरच हा कायदा लागू केला जाऊ शकतो. मतदार पूनर्रचना २०२६ साली होणार आहे. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी जनगणना आणि मतदारसंघ परिसीमन होईल का? हा खरा प्रश्न आहे, ही सर्व परिस्थिती पाहता महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर झाले तरी त्याची अंमलबजावणी लगेच होईच असे दिसत नाही.

महिलांना राजकारणातही संधी देण्याच्या दृष्टीने स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ महिला आरक्षण दिले. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीएचे सरकार असताना सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मांडून ते मंजूर करण्यात आले. महिला आरक्षण विधेयकासाठी सोनिया गांधी ह्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. भाजपाची आरक्षण व महिलांबाबतची भूमिका पाहता या विधेयकाची अंमलबाजणी होईल, असे वाटत नाही. भाजपाला आता लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांचा पाठिंबा मिळावा यासाठी मोदी सरकारची धडपड सुरु आहे आणि केवळ निवडणुकीवर डोळा ठेवूनच हे विधेयक आणले असल्याचा टोलाही नाना पटोलेंनी लगावला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते