Ravi Rana and Navaneet Rana Team Lokshahi
राजकारण

राणा दाम्पत्याला आज न्यायालयात हजर करणार

राणा दाम्पत्य मातोश्रीसमोर करणार होते हनुमान चालिसा पठण

Published by : Vikrant Shinde

मागच्या अनेक दिवसात राज्यात हनुमान चालिसाच्या नावाखाली राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. त्यातच आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा ह्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा (hanuman chalisa) पठण करण्याची भुमिका घेतली होती.

मात्र 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा (hanuman chalisa) पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने (Navneet Rana) मागे घेतली. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं कारण देत आपण हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा राणा दाम्पत्यांने केली. परंतू, त्यानंतरही शिवसैनिकांची आक्रमकता कमी झाली नाही. शिवसैनिकांनी त्यांच्या खार मधल्या घराबाहेर गर्दी केली होती. तसेच राणा दाम्पत्यांनी माफी मागावी अशा घोषणा देखील दिल्या गेल्या.

दरम्यान खार पोलीसांनी राणा दाम्पत्याची घरी पोहोचत त्यांना अटक केली. चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. तसेच, 149-अ ह्या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ह्याच प्रकरणात आज राणा दाम्पत्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा