राजकारण

Nawab Malik : मोठी बातमी; नवाब मलिक यांना जामीन मंजूर

नवाब मलिकांना मिळाला जामीन

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना वैद्यकीय आधारावर सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात आला. नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. किडनीच्या ट्रान्सप्लांटसाठी मलिकांनी  आधी हायकोर्टाकडे जामीनाची मागणी केली होती. त्यावेळी ईडीनं जोरदार विरोध केला होता. मात्र आज सुप्रीम कोर्टात ईडीने कोणताही विरोध केला नाही. 

जवळपास दीड वर्षांपासून कारावासात होते. यापूर्वी हायकोर्टाने मलिकांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र आता मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवाब मलिकांची एक किडनी निकामी झालीय आणि ते सध्या एकाच किडनीवर आहेत. मलिकांवर सध्या उपचार सुरु आहेत.

ईडीच्या कोठडीत का होते मलिक?

नवाब मलिक यांनी सरदार शहावली खानच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरुंचा सर्व्हे केला. मलिक यांनी सरदार खान आणि हसीना पारकरसोबत अनेकदा बैठका केल्या. मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीर एक गाळा अडवून ठेवला. 1993 च्या बॉम्बस्फोटातला आरोपी सरदार शहावली खान जेलमधून पॅरोलवर बाहेर यायचा तेव्हा मलिक आणि हसीना पारकर यांच्यात बैठका व्हायच्या. गोवावाला कंपाऊंडचा अधिकाधिक भाग गिळंकृत करण्यासाठी मलिकांनी बेकायदेशीर भाडेकरु घुसवले. हसीना पारकरने सलीम पटेलच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडचा वाद मिटवल्याची हसीनाच्या मुलाने कबुली दिली. काही काळाने ही मालमत्ता नवाब मलिकांना विकण्यात आली. हसीना पारकरचा मुलगा अलिशान याने याबाबत कबुली दिल्याचा ईडीच्या आरोपपत्रात उल्लेख आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा