NCP | BJP Team Lokshahi
राजकारण

एमसीए अध्यपदाच्या निवडणुकीसाठी भाजपची राष्ट्रवादीला साथ, राजकीय वर्तुळात चर्चा

या निवडणुकीत प्रतिस्पर्धी गट शरद पवार आणि आशिष शेलार आता एकत्रपणे संयुक्त पॅनल घेऊन मैदानात उतरणार आहेत

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या वेगवेगळ्या कारणावरून राजकरण ढवळून निघाले आहे. अशातच अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक चर्चेत असताना, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक 20 ऑक्टोबरला पार पडणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रतिस्पर्धी गट शरद पवार आणि आशिष शेलार आता एकत्रपणे संयुक्त पॅनल घेऊन मैदानात उतरणार आहेत. या निवडणुकीत आधी पवार आणि शेलार गट वेगवेगळे उतरणार होते, पण आता दोघेही एकत्रपण निवडणूक लढवणार असल्याने एक वेगळीच चर्चा राजकारणात सुरु झाली आहे. नव्याने समोर आलेल्या यादीत माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचं नाव नसल्याचं दिसून आलं आहे.

यावर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचं संयुक्त पॅनल असणार आहे. यावेळी आशिष शेलार अध्यक्षपदासाठी तर अमोल काळे उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. तर सचिवपदासाठी अजिंक्य नाईकांची उमेदवारी असून संयुक्त सचिव दीपक पाटील तर खजिनदारपदासाठी अरमान मलिकांना उमेदवारी दिली आहे. कार्यकारिणीत जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, निलेश भोसले यांच्यासह 9 जण असणार आहेत.

माजी क्रिकेटर संदीप पाटील माघार घेणार नसल्याने शेलार आणि संदीप पाटील यांच्यात या अध्यक्षपदाचा निवडणुकीची चुरस रंगणार असल्याचे दिसून येत आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेत्यामध्ये एमसीए अध्यपदासाठी लढत रंगणार आहे. याआधी म्हणजेच 2011 मध्ये माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात अध्यपदासाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी यंदा होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?