राजकारण

शिवसेनेच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात; मातोश्रीबाहेर लावले बॅनरबाजी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीरकडून पाठींबा जाहीर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दसरा मेळाव्यावरुन शिवसेना व शिंदे गट एकमेकांसमोर आले असून शक्तीप्रदर्शनासाठी जोरदार तयारी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने थेट मातोश्रीबाहेर बॅनर लावत शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यानंतर आम्हीच खरी शिवसेना म्हणत शिंदे गटाने दसरा मेळाव्यावरही हक्क दाखवला आहे. बीकेसीवर पार पडणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात बसेसचे बुकींग करण्यात आले आहे. अशातच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला समर्थनार्थ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. मातोश्री तसेच सेनाभवनच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर पाठींब्याची बॅनरबाजी करण्यात आली आहे.

एक संघटना, एक विचार, एक मैदान... शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या, खूप खूप शुभेच्छा, असा आश्य बॅनरवर लिहीला असून यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील यांचे फोटे आहेत. तत्पूर्वी, कॉंग्रेसनेही शिवसेनेच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली होती.

दरम्यान, शिवसेना व शिंदे गटाची दसरा मेळव्याची तयारी जोरदार सुरु आहे. या मेळाव्यात आपलीच शिवसेना खरी सांगण्याचा प्रतत्न करण्याची शक्यता आहे. यामुळे मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा