राजकारण

'गोपीचंद पडळकर यांची मंगळसूत्र चोर, दारू विकणारे अशी ओळख'

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा गोपीचंद पडळकरांवर घणाघात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

उदय चक्रधर | भंडारा : भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणजे मंगळसूत्र चोर, दारू विकणारे अशी ओळख, असा घणाघात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला आहे. पडळकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वे शरद पवार यांच्यावर केलेला टीकेचा मेहबूब शेख यांनी समाचार घेतला. तुमसरात 'शरद युवा संवाद' यात्रेत ते बोलत होते.

गेली ३० ते ४० वर्ष स्वबळावर मुख्यमंत्री आणता आला नाही किंवा तीन अंकी आमदार आणता आले नाहीत. ते आता सत्तांतराची स्वप्न पाहत आहेत, अशा टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केली होती. यावर मेहबूब शेख यांनी प्रत्युत्तर दिले असून गोपीचंद पडळकर यांना आमदारकी केवळ पवार कुटुंबावर भूंकण्यासाठी मिळाली असून गोपीचंद पडळकर म्हणजे मंगळसूत्र चोर, दारू विकणारे अशी ओळख आहे. यावेळी शेख यांनी गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख 'टोपी'चंद असा केला आहे. पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर बोलले म्हणजे सूर्यावर थूंकन्यासारखे आहे, अशीही टीका त्यांनी केली.

तर, यावेळी मेहबूब शेख यांनी राणे कुटुंबीयांवरही निशाणा साधला आहे. जिकडे सत्ता तिकडे राणे कुटुंब, अशी प्रचिती निलेश राणे यांची झाली असल्याचा पलटवार मेहबूब शेख यांनी केला आहे. एकेकाळी राणे कुटुंब भाजपविरोधी होते. आता मात्र ईडीच्या भीतीने राणे कुटुंब भाजपमध्ये गेले असून वॉशिंग मशिनमध्ये धुतले गेले असल्याच्या टोलाही शेख यांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा