Rupali Thombare | Amruta Fadnavis Team Lokshahi
राजकारण

कर्तव्यदक्ष मिसेस उपमुख्यमंत्री कुठे आहेत? रुपाली ठोंबरेंचा अमृता फडणवीसांवर घणाघात

मविआ सरकारला वेळोवेळी सल्ले देत होतात. ते सल्ले तुम्ही आता आपल्या पतीला देणार आहात का?”

Published by : Sagar Pradhan

परतीच्या पावसाने सध्या राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी शेतीचे बरेच नुकसान झाले. दरम्यान, सोमवारी पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. तसेच झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या होत्या. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसून आले. यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना अमृता फडणीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.

काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे?

“अमृता फडणवीस महाविकास आघाडी सरकार असताना जागरुक नागरिक होत्या. त्यावेळी त्यांनी पाणी साचलेल्या भागात फोटोसेशन करून मुंबईला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न विचारत एक ट्वीट केले होते. मात्र, आता पुण्यात पाणी साचल्यानंतर कर्तव्यदक्ष मिसेस उपमुख्यमंत्री कुठे आहेत? असे विधान ठोंबरे यांनी केले आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सध्या त्यांचे पती सरकारमध्ये आहेत. ज्यापद्धतीने तुम्ही महाविकास आघाडी सरकारला वेळोवेळी सल्ले देत होतात. ते सल्ले तुम्ही आता आपल्या पतीला देणार आहात का?” असा प्रश्न ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांना विचारला आहे. “विरोधात असताना सत्ताधाऱ्यांवर आरोप करणे सोप्प असते. मात्र, स्वत: सत्तेत असताना आपल्या लोकांचे कान धरणे अवघड असते आणि ते अमृता ताईंनी करावे, कारण त्या परखड बोलणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी आता जागे होण्याची सध्या गरज आहे”, असा टोलाही जोरदार टोला अमृता फडणवीसांना लगावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद