Rohit Pawar | Bhagatsingh Koshyari Team Lokshahi
राजकारण

पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही, रोहित पवारांची राज्यपालांवर टीका

राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात.

Published by : Sagar Pradhan

राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना दुसरीकडे मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या या विधानावर सर्वच स्तरातून निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावरूनच आता राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांवर खरमरीत टीका केली आहे.

राज्यपालांच्या विधानानंतर राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी ट्वीटरवरून राज्यपालांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते.

काय म्हणाले होते राज्यपाल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Police : महाराष्ट्र पोलीस भरतीत मोठी संधी!, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही पोलीस भरतीत अर्जाची परवानगी

Bigg Boss Season 19 : नेहल चुडासमाचे अमाल मलिकवर गंभीर आरोप; बिग बॉस 19 मध्ये वादाची लाट

ITR FILING : आता दिवस उरले 3, आयटीआर भरायला उशिरा झाला भरल्यास काय होते जाणून घ्या...

Donald Trump On Charlie Kirk : "चार्ली कर्कचा मारेकरी पकडला गेला आहे", चार्ली कर्क यांच्या हत्येप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक खुलासा