Rohit Pawar  Lokshahi
राजकारण

Rohit Pawar On BJP: "...ती भाजपची स्टाईल आहे"; आमदार रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यक्रमात आमदार रोहित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Published by : Naresh Shende

Rohit Pawar Speech : पिंपरी- चिंचवड शहराचा विकास स्थानिक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांनी केला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचं श्रेय काही जण घेतात. जसा व्हाडप्या असतो, तो म्हणतो सर्व मीच केलं, जो भाजी, मीठ, भाकरी, स्वयंपाक बनवतो अशा सर्व लोकांना श्रेय जातं. पण, काही लोकांना श्रेय स्वतः कडे ठेवावं लागतं, मी पणा आहे, ती भाजप ची स्टाईल आहे, भाजप मध्ये मी पणा चालतो, पण इथं तो मी पणा चालत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात रोहित पवार म्हणाले, १२ डिसेंबरला शरद पवार यांचा ८५ वा वाढदिवस आहे. ८५-९० जागा लढू, पण कमीत कमी आपले ८५ आमदार निवडून आले पाहिजेत, असा विचार आणि निर्धार आम्ही ठेवला आहे. तिन्ही विधानसभा आपल्याकडे याव्यात यासाठी मी प्रयत्न करतोय.

लोकसभेत पैशांची काय किंमत आहे हे जनतेनं दाखवून दिलं. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांचा विरोधात खर्च केला गेला. पैशांच्या पुढे लोकशाहीची ताकद जास्त आहे हे दाखवून दिलं आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये 85 नगरसेवक निवडून आले पाहिजेत. हात वर करून मोठ्या आवाज द्या, तो घुमला पाहिजे, उद्या कोणाची सभा असेल तिथं केवळ पवार साहेबांचा आवाज घुमला पाहिजे, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा