(NCP Vardhapan Din) काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन पार पडला. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दोन्ही राष्ट्रवादीकडून वेगवेगळा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्धापन दिनानिमित्त बालेवाडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमाला छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील , दत्तात्रय भरणे हे महत्वाचे नेते गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले. त्यामळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सांगितले की, वर्धापन दिन पुण्यात असला तरी राज्याच्या इतरही भागात आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला आपले काही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते उपस्थित राहू शकले नाहीत. छगन भुजबळ यांचा आधीच विदेश दौरा ठरलेला होता आणि दत्तात्रय भरणे यांचाही विदेश दौरा ठरलेला होता. दिलीप वळसे पाटील यांची तब्येत बरी नाही. यामुळे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हे तीनही नेते उपस्थित राहू शकले नाहीत.