राजकारण

Nilesh Rane : कॅरम खेळण्यापुरते पण शिल्लक राहणार नाहीत

निलेश राणे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भावनिक भाषणानंतरही शिवसेनेतून (Shivsena) आऊटगोईंग सुरुच आहे. शिवसेनेची मुलूख मैदान तोफ म्हणून ओळख असणारे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांच्यानंतर आणखी तीन आमदार आज गुवाहटीला रवाना झाले आहेत. यामुळे ठाकरे सरकारवर नामुष्की ओढावली आहे, या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री काल म्हणाले ज्यांना जायचे त्यांनी जा, पटकन अजून 6 आमदार निघून गेले. कॅरम खेळण्यापुरते पण शिल्लक राहणार नाहीत असं दिसतंय, अशी टीका निलेश राणे यांनी म्हंटले आहे.

तर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी रात्री वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे रवाना झाले. यावर निलेश राणे यांनी दुसऱ्यांची घरं पाडणार्‍या व्यक्तीला आज नियतीने घर सोडायला लावले, अशी टीका केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी शिवसैनिकांसाठी भावनिक भाषण केले. एकनाथ शिंदे यांना व इतर आमदारांना परतण्याचं आवाहन केले. एकीकडे त्यांचे भाषण सुरु असतांना शिवसेनेची मुलूख मैदान तोफ म्हणून ओळख असणारे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यांसह 4 आमदार शिंदे गटात पोहोचले आहे. तर सेनेचे तीन आमदार आता गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. ते तीन आमदार नेमके कोण आहेत, त्यांची नावं आत्तापर्यंत समजलेली नाहीत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा