Nilesh Rane 
राजकारण

Nilesh Rane : निलेश राणे आज शिवसेनेत प्रवेश करणार

निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज प्रवेश होणार असून कुडाळमधील मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

निलेश राणे यांच्या हाती 20 वर्षांनी पुन्हा धनुष्यबाण येणार असून कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढण्यास निलेश राणे इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. आज 4 वाजता निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत पक्ष प्रवेशाची माहिती दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Neeraj Chopra : जागतिक स्पर्धेत नीरज आठव्या स्थानी; तर सचिन यादवची लक्षवेधी कामगिरी

Uttarakhand landslide : उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू; सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Maharashtra Police : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ, एक पोलीस अंमलदार' योजना

Latest Marathi News Update live : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'