राजकारण

उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं; नितेश राणेंचा दावा

भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सिंधुदुर्ग : भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. स्वतःच्या आईवर दबाव आणत होता, असा दावा नितेश राणेंनी केला आहे.

काल आदित्य ठाकरेंनी उल्लेख केला की नितेश राणेंपेक्षा माझ्यावर चांगले संस्कार झाले. तुझ्यावर चांगले संस्कार झाले असते तर दिशा सालीयन जिवंत असली असती. उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. स्वतःच्या आईवर दबाव आणत होता. जोपर्यंत माझं नाव पुकारलं जात नाही तोपर्यंत दाओस मधून येणार नाही असं म्हणाला होता, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे बारसुला येणार आहेत. त्यासाठी त्यांनी काही गुंडांना बोलावले आहेत. काही गुंडांना कालपासून मेसेज जाता आहेत. चला कोकणात जायचं आहे. याचा इन्कार केलात तर मी स्क्रीनशॉटसह जाहीर करेन. बारसुला येण्यासाठी तुम्हाला गुंड का लागतात? पोलिसांना विनंती करतो की उद्धव ठाकरेंबरोबर येणाऱ्या सर्वांची चौकशी करा, असे आवाहन राणेंनी पोलिसांना केले आहे.

उद्धव ठाकरे तुम्ही खरंच मर्द असाल तर उद्या व्यासपीठावर काँग्रेसचा निषेध करून दाखवा. तेवढी हिंमत तुझ्यात नाही हे मला माहिती आहे. म्हणून उद्याच्या वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरे ही हिंमत करतात का हे मला बघायचं, असेही नितेश राणेंनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा