Nitesh Rane on Tata AirBus Project Shifted to Gujrat Team Lokshahi
राजकारण

"टाटा-एअरबस प्रकल्पाचा महाराष्ट्राला टाटा! हे तर ठाकरे सरकारच्या कोलदांडा प्रवृत्तीचे पाप" - नितेश राणे

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे.

Published by : Vikrant Shinde

निसार शेख, चिपळूण

सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे करून आता उलटा कांगावा सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशांतर्गत विमान निर्मितीच्या या प्रकल्पासाठी 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. एअरबस आणि टाटा यांच्यातील करारानुसार संयुक्तपणे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पास संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखविल्याचे रतन टाटा यांनी त्याच दिवशी जाहीरही केले. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. या वस्तुस्थितीची माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबतही ठाकरे सरकारने असाच बेजबाबदारपणा दाखवून तो प्रकल्प घालविला. या प्रकल्पातूनही वाटाघाटीद्वारे वसुलीचा छुपा हेतू तर नव्हता ना, अशी शंकाही श्री राणे यांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा