राजकारण

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त 'या' दिवशी होणार बीकेसी मैदानावर काँग्रेस पक्षाची सभा

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त बीकेसी मैदान मुंबई येथे काँग्रेस पक्षाकडून भव्य अशी जाहीर सभा घेण्यात येणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

20 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त बीकेसी मैदान मुंबई येथे काँग्रेस पक्षाकडून भव्य अशी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. याच दिवशी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे .

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेच्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस वेणूगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षाचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा मंचावर उपस्थित असतील.

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईत काँग्रेस पक्षाकडून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांना पत्र लिहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?