राजकारण

अधिवेशनाआधी विरोधकांच्या '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा; तर रोहित पवार अन् मिटकरींची अनोखी गांधीगिरी

हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. विविध मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. विविध मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. अधिवेशन सुरु होण्याआधी विरोधी पक्षांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली आहे. सोबत 50 खोके एकदम ओकेचे बॅनर झळकले आहेत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार व आमदार अमोल मिटकरी हे अधिवेशनात येणाऱ्या सर्व आमदार व मंत्र्यांना महापुरुषांची पुस्तके भेट देत आहे

कर्नाटक सरकार हाय हाय.. बोम्मई सरकार हाय हाय... शिंदे सरकार हाय हाय... गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप... खोके सरकार, खोटे सरकार... ५० खोके एकदम ओके... खोके सरकार काय म्हणतंय,गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय... शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय...महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक...मिंधे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला. यात विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादस दानवे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड आदी नेते सहभागी झाले आहेत.

याचवेळी रोहित पवार व अमोल मिटकरी यांनी गांधीगिरी दाखवत सर्व आमदार व मंत्र्यांना महापुरुषांची पुस्तके भेट देत आहे. दोन्ही आमदार विधानसभेच्या गेट जवळ असून आपल्या हातात महापुरुषांची पुस्तके घेऊन ती पुस्तके घेऊन मंत्री व आमदारांना देत आहे.

दरम्यान, दोन वर्षांच्या कोरोना लाटेनंतर प्रथमच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. सात महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप, वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापतं राहिलंय. याचे पडसाद आज हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळणार आहेत. यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ

Beed Rain Update : बीडमध्ये पावसाचा कहर; आज शाळांना सुट्टी जाहीर

Latest Marathi News Update live : काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीला

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार