पंकजा मुंडे यांनी लोकशाही मराठीसोबत बोलत असताना अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. यावेळी त्यांनी सांगितलं की, आता पहिल्यासारख राजकारण राहिलेलं नाही. तसेच नव्या पिढीच्या नेत्यांसाठी मी असं बोलणं की, आता पहिल्यासारख राजकारण राहिलेलं नाही. हे नव्या पिढीच्या नेत्यांसाठी अन्याकारक होईल. तसेच त्यांनी राज ठाकरे यांच्या नद्यांबाबत भूमिकांवर मंत्री पंकाजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंनी मांडलेला नद्यांचा विषय हा महत्त्वाचा असून त्यांनी कोणतीही अॅक्शन घेण्याआधी नियमांकडे लक्ष देणे महत्त्वाचं आहे.
बीडची बदनामी केली जात आहे - पंकजा मुंडे
तसेच बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बोलताना सांगितल की, या प्रकरणामुळे बीडला मोठ्या प्रमाणात बदनाम करण्यात आलं. तसेच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळणार की नाही यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, त्यांना न्याय मिळायला हवा असंच मला देखील वाटत आणि तसं मी अनेक वेळा म्हणाले देखील आहे. ज्यांचा काही प्रकरणात संबंध नाही त्यांना देखील काही गोष्टी भोगाव्या लागत आहे. एखादी घटना घडल्यानंतर तो जिल्हा बदनाम नाही झाला पाहिजे, त्या जिल्ह्याचा काही दोष नसतो.
पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा?
मुंडे कुटुंबावर करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आमच्या कुटुंबावर कोणी काही बोललं नाही, धनंजय मुंडेंवर बोलले कारण त्यांचे सहकारी त्यात अडकले गेले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा देखील दिला आता अजून काय केलं पाहिजे? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना केला आहे.