थोडक्यात
करुणा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
पंकजा मुंडे विरुद्ध करुणा मुंडे निवडणूक लढणार
बीड जिल्ह्यातील सर्व जागांवर निवडणूक लढणार
(Pankaja Munde VS Karuna Munde) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच बीड जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता करुणा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. करुणा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र काही त्रुटी निघाल्यामुळे हा अर्ज बाद ठरला होता. आता करुणा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे.
करुणा मुंडे बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व जागांवर निवडणूक लढणार आहेत. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे विरुद्ध करुणा मुंडे असे आता पाहायला मिळणार असून ही निवडणूक कशा पद्धतीने पार पडते याकडे मात्र संपूर्ण बीड जिल्ह्यात राज्याचे लक्ष लागले आहे.